‘कोवळे वर्तमान’ ही कादंबरी शिक्षण, समाज-संस्कृतीचे चिंतनसुक्त आहे!
श्रीकांत देशमुख हे मूलतः कवी असल्याने त्यांच्या निवेदनात, विश्लेषणात, वर्णनात पसरटपणा, पाल्हाळ नाही. त्यामुळे कथनातील सहजता, नेमकेपणा आणि प्रवाही निवेदन, त्यातील अल्पाक्षरत्व व अर्थ बाहुल्य हे त्यांच्या कथनाची सामर्थ्य आहेत. त्यांची ही शैलीसुबकता या कादंबरीतून पुन्हा ठळक झाली आहे. समष्टीबद्दलचा सहानुभाव, माणसाच्या जगण्याची, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची वृत्ती यामुळे ही कादंबरी सवंग रंजनात अडकत नाही.......